फ्रीज बंद करून एक भांडं उकळत्या पाण्याने भरून फ्रिजरमध्ये ठेवा आणि दार बंद करा. वाफेमुळे बर्फ सहज वितळेल.
फ्रीज बंद करून त्या नंतर फ्रिजरचे दार उघडून हेअर ड्रायर मधील गरम हवा साचलेल्या बर्फावर सोडा.
यामुळे वातावरणातील उष्णतेमुळे बर्फ वितळण्यास मदत होईल.
फ्रीजरचे तापमान 18 अंश सेल्सिअसवर सेट करणे आवश्यक आहे. या तापमानावर सेट न केल्यास वारंवार बर्फ जमण्याचा त्रास होऊ शकतो.
फ्रिजरचा दरवाजा वारंवार उघडल्यास बाहेरून ओलावा रेफ्रिजरेटरमध्ये येतो आणि बर्फ साचतो.
जर तुमचा फ्रीज रिकामा असेल तर त्यात आर्द्रतेमुळे जास्त बर्फ तयार होतो. शक्य असल्यास, फ्रीज नेहमी सामानाने पॅक करून ठेवा.