गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) म्हणजे हिंदू धर्माचं नवीन वर्ष. गुढी पाडव्याच्या दिवशी हापूस आंब्याची पहिली पेटी (Hapus Mango) खरेदी करण्याची ही काही ठिकाणी परंपरा आहे. हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होताना पाहायला मिळते. कोकणातील हापूसला (Hapus) जगाच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याची किंमतही जास्त असते. त्यामुळे बाजारात देवगड, रत्नागिरी हापूस असं सांगून ग्राहकांची फसवणूक केली जाते. हापूस खरेदी करताना नीट तपासून घ्या आणि हापूस आंब्याच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ देऊ नका. अस्सल हापूस आंबा कसा ओळखावा? हे वाचा अस्सल हापूस आंब्याचा देठ खोल असतो. अस्सल हापूस आंब्याच्या सुगंध वेगळा असतो. हापूस आंब्याची साल पातळ असते. हापूस बॉटल ग्रीन रंगाचा असतो, इतर आंबे बेलग्रीन रंगाचे असतात. हापूस आंबा कापल्यावर आतून केशरी रंगाचा असतो, तर ड्युपलिकेट हापूस आतून पिवळ्या रंगाचा असतो.