रोज सकाळी रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.
दुधीचा रस प्यायल्याने पोट अधिक काळ भरलेले राहते, त्यामुळे मेटाबॉलिज्म चांगले राहते, परिणामी तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
साध्यासोप्या पद्धतीने घरीच बनवा दुधीचा रस, जाणून घ्या रेसिपी...
सर्वप्रथम दुधीला स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या.
त्यांनतर दुधीचे छोटे छोटे तुकडे करा.
आता कुकरमध्ये दुधी आणि थोडे पाणी टाकून 1 शिट्टी काढून घ्या.
त्यानंतर मिक्सरमध्ये उकडलेले दुधीचे तुकडे टाका.
त्याचसोबत पुदिन्याची पाने, काळी मिरची पावडर, आल्याचा तुकडा, जिरे ,थोडे लिंबू पिळा आणि चवीनुसार मीठ घाला.
या सर्व मिश्रणात थोड पाणी टाकून छान स्मूदी तयार करा.
अशाप्रकारे दुधीचा रस तयार झाला.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.