तुमचे वाढते वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर ही पेये तुमच्यासाठी आहेत.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

काही घरगुती पेयांचा वापर करून तुम्ही 30 दिवसांत तुमचे वाढते वजन नियंत्रित करू शकतात.

Image Source: pexels

लिंबू मध पाणी

वजन कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळा आणि सकाळी हे पाणी प्या.

Image Source: pexels

आले लिंबूपाणी

एक ग्लास गरम पाण्यात लिंबू आणि आल्याचा रस मिक्स करून पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुधारते.

Image Source: pexels

हळदीचे पाणी

एक ग्लास गरम पाण्यात त्यात चिमूटभर हळद मिसळा. कढ येईपर्यंत ते पाणी उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून थंड झाल्यावर प्या. असे केल्याने वजन नियंत्रणास मदत होते.

Image Source: pexels

ओव्याचे पाणी

एक कप गरम पाण्यात ओवा टाका. तो चांगला उकळल्यानंतर पाणी गाळून प्या.

Image Source: pexels

जिरे पाणी

एक चमचा जिरे रात्रभर एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर हे पाणी कोमट उकळून प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Image Source: pexels