वृंदावन, उत्तर प्रदेश : वसंत ऋतूतील फुले आणि रंगांनी वृंदावन येथे होळी खेळली जाते. वृंदावनातील 'बांके बिहार मंदिर' हे होळी उत्सवाचे केंद्रस्थान आहे. (Photo Credit : unsplash)
हम्पी, कर्नाटक : पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी हम्पीला ओळखल जात. पारंपारिक संगीत आणि नृत्याचा आनंद घेण्यासाठी लोक येथे येतात. (Photo Credit : unsplash)
मथुरा, उत्तर प्रदेश : मथुरा हे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे. येथील द्वारकाधीश मंदिरात रंगांची उधळण पाहायला मिळते. (Photo Credit : unsplash)
बरसाना, उत्तर प्रदेश : बरसाना येथे राधेचा जन्म झाला. बरसाना हे लाठमार होळीसाठी प्रसिद्ध आहे.स्त्रिया पुरुषांना लाठीने मारतात कारण ते त्यांना रंगाने मारण्याचा प्रयत्न करतात. (Photo Credit : unsplash)
उदयपूर, राजस्थान : उदयपूर हे राजेशाही होळी साजरे करण्यासाठी ओळखले जाते. उदयपूर येथील होळीला लोकसंगीत आणि नृत्याची साथ असते. (Photo Credit : unsplash)
शांतीनिकेतन, पश्चिम बंगाल : नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी होळीचा सांस्कृतिक आणि संगीतमय 'बसंत उत्सव' येथे सुरु केला. (Photo Credit : unsplash)
आनंदपूर साहिब, पंजाब : आनंदपूर साहिब 'होला मोहल्ला' उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. (Photo Credit : unsplash)
दिल्ली : दिल्लीतील चांदनी चौकमध्ये होळी उत्सह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. संपूर्ण शहरात पारंपारिक होळी पार्टी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. (Photo Credit : unsplash)
जयपूर, राजस्थान : गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमधील होळी उत्सव 'हत्ती उत्सव' म्हणून ओळखला जातो, कारण हत्तींना रंगविले जाते आणि मिरवणूक काढली जाते. (Photo Credit : unsplash)
गोवा : गोवा हे होळीला बीच पार्टीसाठी ओळखलं जात. गोवा किनारपट्टीच्या सौंदर्यात होळीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक येथे मोठ्या संख्येने एकत्र येतात. (Photo Credit : unsplash)