सध्या संपूर्ण देशात उष्णतेत वाढ होताना दिसत आहे.
उष्णतेच्या वाढत्या झळांनी नागरिक अक्षरश: त्रस्त होतात.
तसेच शरीरात पाण्याची कमतरता देखील जाणवू लागते.
तुम्ही कलिंगडापासून बनलेल्या हे पदार्थ ट्राय करून नक्की बघा.
हे पदार्थ खाण्यास आणि पिण्यास अतिशय चवदार आहेत.
उन्हाळ्यात अन्न खाणे सोपे असते परंतु अन्न पचवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक कलिंगडाचे सेवन करतात.
कलिंगडचा रस हा एक उत्तम पर्याय आहे याने तुमचे शरीर नेहमी निरोगी राहील.
दूध आणि कलिंगडापासून हेल्दी मिल्क शेक ही बनावता येते.
कलिंगड कोशिंबीर हे सॅलेड तुमच्या आरोग्यासाठीही खूप चांगले आहे. याशिवाय ते तुम्हाला फ्रेश ठेवते.
या ऋतूत दही सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. अशा परिस्थितीत तुम्ही कलिंगड रायता बनवून खाऊ शकता.