असे अनेक लोक असतात ज्यांना काळोखात राहायला आवडते.
काहींना एकट राहायला आवडतं किंवा काही लोकांना खोलीतून बाहेर जायला ही आवडत नाही.
आणि कोणाला हेडफोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकायला आवडतं.
पण या सर्व गोष्टींमुळे तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो.
अपुऱ्या झोपेमुळे तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो. नियमित किमान 8 तास झोप ही महत्वाची आहे.
तुम्ही तुमचा नाश्ता करणं कधीही टाळू नका या गोष्टीने देखील तुमच्या मेंदूला त्रास होऊ शकतो.
पुरेसे पानी न पिण्यामुळे तुमची विचार करण्याची किंवा निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.
नकारात्मक विचार करणे टाळा नकारात्मक विचार तुमच्या मेंदूला हानिकारक ठरतात.
अतिरिक्त स्क्रीन टाइम वाढल्यामूळे सुद्धा तुमच्या मेंदूवर परिमाण होऊ शकतो.
जास्त साखर असलेले पदार्थ,शीतपेय इत्यादी गोष्टीचे सेवनामूळे मेंदूला धोका निर्माण होऊ शकतो.