नियमित रोज सूर्यनमस्काराचे आसन करणे हे उत्तम आणि निरोगी शरीर म्हणून ओळखले जाते.
प्रत्येक आसनाचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व आहे.
हा एक पारंपारिक योग क्रम आहे ज्यामध्ये १२ आसनांची मालिका समाविष्ट आहे.
रोज सुर्य नमस्कार केल्यास मणक्याचे दुखणे, मानदुखी आणि पाठदुखीपासूनही आराम मिळतो.
दररोज सूर्यनमस्कार केल्याने तुमची पचनसंस्था उत्तम राहते.
सूर्यनमस्कार केल्याणे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर एक वेगळी चमक येते.
दररोज सूर्यनमस्कार केल्याणे तुमचे मन शांत होते आणि तुमचा ताणही कमी होतो.
सूर्यनमस्कार केल्याणे तुमचे हृदयाचे स्नायू मजबूत करते आणि तुमचे हृदय निरोगी राहते.
सूर्यनमस्कार केल्याणे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळते आणि निरोगी वजन राखण्यास मदत होते.
यामुळे तुमची फुफ्फुस मजबूत होतात आणि तुमच्या फुफ्फुसाची क्षमताही वाढते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)