दररोज कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
मधामध्ये जीवनसत्वे ए,बी,सी, कॅल्शियम, आयोडीन, लोह यासारखे शरीराला आवश्यक पोषक घटक असतात.
कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहते.
सकाळी मध टाकून कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
मधामध्ये प्रीबायोटिक गुणधर्म असतात जे आतड्यांमध्ये फायदेशीर बॅक्टेरिया वाढवतात ज्यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते.
मधामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. पाणी आणि मध प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकरशक्ती वाढते आणि संसर्गापासून तुमचे संरक्षण होते.
मध बहुतेकदा स्किनकेअर प्रोडक्टसमध्ये वापरला जातो. मधाचे सेवन केल्याने त्वचेच्या समस्या कमी होतात.
मधामध्ये दाहक-विरोधी गुण असतात जे घसा खवखवणे किंवा इतर रोगांपासून मुक्त होण्यास मदत करतात.
गरम पाणी आणि मध एकत्रित करून प्यायल्याने व्यायामानंतर स्नायू दुखणे कमी होण्यास मदत होते.
मात्र यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने, रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी मधाचे सेवन टाळावे.