शरीराचे वजन वाढण्याची अनेक करणे असतात.
मात्र शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्याने आणि आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीचे सेवन केल्याने वजन वाढते.
जर तुम्हाला वेगाने वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात बदल करावा लागेल.
रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्या यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
त्यानंतर भूक लागल्यास तुम्ही फळांचे सेवन करू शकता.
दुपारच्या जेवणात तुम्ही रोटीसोबत हिरव्या भाज्यांनचा समावेश करा आणि त्याबरोबर रोज जेवणात सलाड खावे. यासोबत तुम्ही दही, ताक यासारख्या गोष्टींचा समावेश करु शकता.
संध्याकाळी तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ड्रायफ्रुट्स यासारख्या कमी कॅलरी असलेल्या गोष्टींचे सेवन करा.
रात्रीच्या जेवणात सूप किंवा काहीतरी हलके खाण्याचा प्रयत्न करा. यासोबतच रात्रीचे जेवण 8 वाजण्यापूर्वी करण्याचा प्रयत्न करा.
स्वत:ला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही जिम जॉईन करू शकता आणि तेथे वेट ट्रेनिंग घेऊ शकता यामुळे तुमचे वजन लवकर कमी होऊ शकते.
तुम्हाला तुमच्या आहारात कॅलरी, कर्बोदक, प्रथिने आणि चरबी यांचे संतुलन ठेवणे महत्वाचे आहे.