बदलती जीवनशैलीत अनेक जबाबदाऱ्यापासून थोडा ब्रेक घेऊन अनेकदा लोक आपल्या कुटुंबासोबत पिकनिकला जातात. व्यस्त जीवनातून ब्रेक घेतला तर काम करण्याची उर्जा मिळते तसेच शरीर आणि मन दोन्हीही रिफ्रेश होतं असं म्हटलं जातं. सुट्ट्यांमध्ये इतके छान क्षण घालवले असतात की, कामावर परताना आळस आणि थकवा जाणवतो. जेव्हाही आपण सुट्टीवर जातो, तेव्हा आपल्या झोपेची पद्धत बदलते, अशा परिस्थितीत आपण नियमित झोपेची काळजी घेणे चांगले होईल. स्वतःसाठी एक वेळापत्रक तयार करा, जेणेकरून तुम्ही सकाळी लवकर उठून कामावर जाऊ शकता. यामुळे कामाच्या दरम्यान तुम्हाला फ्रेश आणि उत्साही वाटेल. दीर्घ विश्रांतीनंतर, तुमचा कार्यप्रवाह विस्कळीत होतो, म्हणून कामावर परत येण्यापूर्वी संपूर्ण योजना तयार करणे महत्त्वाचे आहे. कामासाठी तुमचे मन तयार करा. यामुळे तुम्हाला काम सुरू करताना कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटत नाही, म्हणून स्वतःला हायड्रेटेड ठेवा. अशावेळी व्यायाम करा, व्यायाम केल्याने आळस दूर होतो. ताजेतवाने वाटण्यास मदत होते. तुम्ही नव्या उर्जेने कामाला लागण्यासाठी सज्ज व्हा.