पुरेशा झोपेसह तुम्ही कसे झोपता यावरही अनेक गोष्टी अवलंबून असल्याचे तज्ञ सांगतात. अनेकदा आपल्या घरातील मोठी माणसे पालथं न झोपण्याचा सल्ला आपल्याला देतात. बहुतेक लोकांना एका अंगावर किंवा पोटावर झोपण्याची सवय असते. तुमच्या झोपेची स्थिती ही तुम्हाला आरामदायक वाटणारी असली तरी त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो का हे पाहणं गरजेचं आहे. डावीकडे झोपताना छातीतील अवयवांवर ताण येऊन फुफुसांवर भार पडू शकतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब जळजळ रक्तातील साखरेची पातळी यांचे नियमन करणारे अनेक घटक झोपेवर अवलंबून असतात. पुरेशा झोपेसह तुम्ही कसे झोपता यावरही अनेक गोष्टी अवलंबून असल्याचे तज्ञ सांगतात. अनेकांना पालथ झोपायची सवय असल्याने छातीवर दबाव निर्माण होऊन रक्तप्रवाह कमी होणे किंवा श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. याचा एकत्रित ताण मज्जातंतून वर येऊन हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीत विकार होण्याची शक्यता असते.