साखरेपेक्षा गूळ बरा, असं म्हणतात ते काही खोटं नाही. गुळात आरोग्यपयोगी अनेक गुणधर्म असतात. यकृत साफ होण्यासाठी गूळ सर्वोत्तम मानलं जातं. गुळात भरपूर कॅल्शियम असतं, ज्यामुळे हाडं भक्कम होतात. शिवाय सांधेदुखीही कमी होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्त शुद्ध राहतं. आयुर्वेदिक डॉक्टर पंकज कुमार सांगतात की, गुळातून आरोग्याला अनेक फायदे मिळतात. गुळात आयर्न, फॉस्फरस, कॅल्शियम, इत्यादी गुणधर्म भरभरून असतात. विशेषतः कफ कमी होण्यासाठी गुळाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत )