आयुर्वेद असो किंवा विज्ञान...आपल्या आरोग्यासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम सांगितला आहे. जेव्हा आपण चालण्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण नेहमी जसं सरळ चालतो, त्याचाच विचार येतो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का ? की उलट म्हणेजच रिव्हर्स चालण्याचे देखील विशेष फायदे असू शकतात ? अलीकडेच, रिव्हर्स चालणे हे फिटनेस क्षेत्रात एक नवीन ट्रेंड म्हणून उदयास आले आहे. उलट चालण्याचे फायदे तुमच्या शरीराचे संतुलन आणि मनाची एकाग्रता सुधारण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही उलटे चालता तेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या शरीराच्या हालचालीवर केंद्रित असते. यामुळे तुमचे मन अधिक सक्रिय आणि सतर्क राहते, ज्यामुळे एकाग्रता सुधारते. याव्यतिरिक्त, हे आपल्या शरीराचे संतुलन सुधारण्यास मदत करते. वजन कमी, स्नायूंना बळकट करण्यासाठी उपयुक्त उलट चालणे हा एक उत्कृष्ट कार्डिओ व्यायाम मानला जातो. (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )