सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं थोडा जास्त चहा होतो. असं म्हणत प्रमाणापेक्षा जास्त चहा पिणारे अनेक आहेत. अनेकांना उठल्याउठल्या चहा लागतोच. चहामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चहा पित असाल तर हृदयाचे आरोग्य चांगले राहून हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. रोपीयन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीने ९ जानेवारी रोजी ऑनलाईन प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार दर दुसऱ्या दिवशी चहा पिणं अपल्या हृदयासाठी चांगलं ठरतं. दीर्घकालीन आरोग्य तपासण्यासाठी एक लाखाहून अधिक जणांवर अभ्यास केला गेला. हिरवा आणि काळा चहा दोन्ही फ्लेव्होनॉइड्स नावाच्या संयुगे समृद्ध असतात जे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. ग्रीन टीमधील संयुगे रक्तवाहिन्यांमधील गुठळ्यांना जोडलेले प्लेक्स तोडण्यास मदत करतात. पॉलीफेनॉल शरिरात दीर्घकाळ साठले जात नसल्यानं एका ठराविक काळापर्यंत चहा पिणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरू शकते.