डाळिंब म्हणजे, पोषक तत्त्वांचं भांडार डाळींबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत... 1. कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी गुणकारी 2. पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत दररोज एक डाळिंब खाल्ल्यानं डायजेस्टीव इंजाइम्स वाढतात, जे पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करतात. 3. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी फायदेशीर डाळिंबात आयर्न मुबलक प्रमाणात असतं, दररोज एक डाळिंब खाल्ल्यानं शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि शरीराला ऊर्जा मिळते 4. हार्मोन्सच्या समस्यांपासून सुटका महिलांमधील हार्मोन्सच्या समस्या दूर करण्यासाठी डाळिंब गुणकारी ठरतं, दररोज एक डाळिंब खाल्ल्यानं मासिक पाळीच्या समस्या दूर होतात. 5. गरोदर पणात गुणकारी गरोदर पणात डाळिंब महिलांसाठी फायदेशीर ठरतं, यामध्ये आढळणार फोलेट आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी गुणकारी ठरतं 6. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरतं, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज एक डाळिंब खाण्याचा सल्ला डॉक्टर सुद्धा देतात याव्यतिरिक्त दररोज एक डाळिंब खाल्यानं हाडांचं आरोग्य सुधारतं सांधेदुखी दूर होते, तसेच, त्वचा तजेलदार होते अशक्यतापणाही दूर होण्यास मदत होते, तर बद्धकोष्ठाची समस्याही दूर होते.