सध्या ठिकठिकाणी गणपती बाप्पााच्या आगमनाची उत्सुकता आहे.

Published by: abp majha web team

त्यातल्याच एका सुप्रसिद्ध गणपती मंडळांपैकी सर्वात लाडका आणि प्रसिद्ध गणपती म्हणजे गणेश गल्ल्ली/मुंबईचा राजा.

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या पौराणिक कथांवर आधारित संकल्पना घेऊन येतं.

त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा एका नवीन संकल्पनेसह मुंबईच्या राजाचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय.

मुंबईचा राजा 2025,ची संकल्पना तामिळनाडूतील रामेश्वरम मंदिराच्या थीमवर आधारित आहे.

रावणाचा वध केल्यानंतर ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी भगवान रामाने शिवलिंगाची पूजा केली.

असे म्हणतात की, जेव्हा हनुमानजींना शिवलिंग आणण्यास उशीर झाला तेव्हा माता सीतेने स्वतः वाळूपासून शिवलिंग बनवले.

यानंतर, कैलास पर्वतावरून हनुमानजींनी आणलेले शिवलिंगही मंदिरात स्थापित करण्यात आले.

दरवर्षी वेगवेगळे मूर्तीकार मुंबईच्या राजाची मूर्ती घडवतात, यावर्षी आकाश तिरमल यांनी ही मूर्ती घडवली आहे.