पिंपल्सवर थुंक लावणे योग्य आहे की नाही?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

मुरुमे ही एक सामान्य त्वचेची समस्या आहे, ज्यामुळे किशोरवयीनांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच त्रस्त असतात.

Image Source: pexels

चेहऱ्यावर पिंपल्स येणं आत्मविश्वास कमी करू शकतं, त्यामुळे लोक विविध घरगुती उपाय करतात.

Image Source: pexels

अलीकडेच अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने सांगितले की ती सकाळी थुंकी पिंपल्सवर लावते, ज्यामुळे तिला फायदा जाणवतो.

Image Source: pexels

या स्थितीत, पिंपल्सवर थुंक लावणे योग्य आहे की नाही, हे जाणून घेऊया.

Image Source: pexels

तज्ञांच्या मते, पिंपल्सवर थुंकी लावू नये.

Image Source: pexels

त्यामुळे इंन्फेक्शन वाढू शकते.

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर थुंक लावल्याने पुरळ अधिक सुजण्याची किंवा पुरळ येण्याची शक्यता असते.

Image Source: pexels

थुंकीत लायसोझाईम नावाचे एंझाईम असते, जे सौम्य अँटी-बॅक्टेरियल मानले जाते.

Image Source: pexels

प्रत्येकाच्या थुंकीत वेगवेगळ्या प्रकारचे जिवाणू असतात, जे कुणासाठी फायदेशीर ठरू शकतात तर कुणाला नुकसानही पोहोचवू शकतात.

Image Source: pexels

आणि प्रत्येक पिंपल बॅक्टेरियामुळे होत नाही, अनेकदा याची कारणे हार्मोन्स, घाण किंवा खाणेपिणे असू शकतात

Image Source: pexels