भारतीय जेवणात दही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. दही आरोग्यासाठी फायदेशीर आहे परंतु त्याचे तोटे ही आहेत. दहयामध्ये प्रोबायोटिक्स,कॅल्शियम आणि इतर पोषक घटक आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मात्र रात्रीच्या जेवणात दही खाणे टाळावे. काही लोकांना रात्रीच्या वेळी दही खाल्यामुळे अपचन किंवा गॅस चा त्रास होऊ शकतो. रात्री दही खाल्ल्याने झोपचा त्रास उद्भवू शकतो. संदेदुखी चा त्रास असलेल्या लोकांनी शक्यतो दहयाचे सेवन करू नये. अतिप्रमाणात दही खाल्ल्याने तुम्हाला खोकला किंवा सर्दीचा सामना करावा लागू शकतो. दहयामध्ये प्रोटीन असले तरी त्यात फॅटही असते. दिवसाला एक कप पेक्षा जास्त दही खाऊ नये.