जास्त गोड खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.



यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार असे आजार होऊ शकतात.



जास्त साखर खाल्ल्यानंतर थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो.



जास्त साखर खाल्ल्याने मूडवर परिणाम होतो.यामुळे तणाव, चिंता, चिडचिड यासारख्या समस्या उद्भवू शकतात.



जास्त गोड खाल्ल्याने आतड्यातील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचे संतुलन बिघडू शकते.



त्यामुळे आतड्यांना सूज येण्याची समस्या उद्भवू शकते.



अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने तुम्हाला पुन्हा-पुन्हा भूक लागू शकते.



साखरेमुळे शरीराचे पचन देखील बिघडू शकते.



सामान्य व्यक्तीने दररोज 30 ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाणे टाळावे.



(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )