आजकाल अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की वजन कमी करण्यासाठी चपाती किंवा भात काय योग्य आहे.
भात आणि चपाती मध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते.
कार्बोहायड्रेट्सचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. म्हणून आपण दोन्ही सेवन केले पाहिजे.
तुम्ही डाएट करत असाल तर ब्राऊन राईस हा एक उत्तम पर्याय आहे.
वजन कमी कऱण्यासाठी आहारात मैद्याचे पदार्थ टाळावे.यासाठी मैदाची चपाती खावू नये.
दोन चपात्यांमध्ये १३०-१४० इतक्या कॅलरीज असतात.तर १०० ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी शिजलेल्या भातामध्येही १४० कॅलरीज असतात.
यासोबतच आहारात हिरव्या भाज्या आणि सॅलड्सचे प्रमाण वाढवा.
तुम्ही भात किंवा चपाती किती प्रमाणात खाताय हे पाहणं देखील गरजेचं आहे.
आहार घेताना भात अथवा चपाती सोबत वाटीभर डाळ तसचं एखादी भाजी आणि सलाड घ्यावं.