आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, खाण्याच्या अयोग्य वेळा, व्यायामाचा अभाव, आणि इतर गोष्टींमुळे लोकांना विविध आजारांनी ग्रासलंय.
कोरोना महामारीनंतर हृदयविकाराच्या घटनांमध्ये आणखी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
सध्या प्रौढ लोकांसह तरुणांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दिसून येत आहे.
हृदयविकाराचा झटका हे मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक मानले जात.
हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास आणि अयोग्य आहारामुळेही हृदयविकाराचा धोका वाढतो.
वाढलेला रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल हे प्रमुख जोखीम घटक मानले जातात.
हृदयविकारासाठी झोपेचा अभाव धोकादायक आहे.
वायुप्रदूषण हे एथेरोस्क्लेरोसिससाठी जबाबदार असल्याचे आढळून आले आहे
वायुप्रदूषण हे श्वासोच्छवासाच्या आरोग्यासाठी आणि फुफ्फुसांसाठी हानिकारक मानले जाते.
अचानक किंवा तीव्र व्यायाम केल्याने हृदयावर दाब वाढतो आणि त्यामुळे रक्तदाब झपाट्याने वाढण्याचा धोका वाढतो