सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे पाणी प्यायल्याने शरीर अनेक आजारांपासून दूर राहते.



आल्यामध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात.



अदरकमध्ये आढळणारे एन्झाईम अन्न पचण्यास मदत करतात .



रोज रिकाम्या पोटी आल्याचे पाणी घेतल्याने गॅस आणि अपचन सारख्या समस्या कमी होतात.



रोज आल्याचे सेवन केल्याने स्नायूंच्या वेदनेपासून आराम मिळतो.



आल्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात.



सकाळी नियमितपणे आल्याचे सेवन केल्यास सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून बचाव होतो.



आल्याची चव तिखट असते,त्यामुळे शक्यतो ते थेट घेणे टाळावे.



आल्याचा रस तुम्ही मध,लिंबाचा रस किंवा इतर कोणत्याही फळांच्या रसात मिसळून घेऊ शकता.



मात्र अतिप्रमाणात आल्याचे सेवन केल्यास विपरीत परिणाम होऊ शकतात.