चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी पौष्टिक आहार घेणं महत्वाचं आहे.
पौष्टिक अन्न घेतल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
डाळिंबात भरपूर अँटीऑक्सिडंट असतात नियमित डाळींबाचे सेवन केल्याने लाल रक्तपेशी वाढतात आणि चेहऱ्यावर चमक येते.
बीट शरीरातील रक्तप्रवाह वाढवते आणि त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करते.
भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात जे शरीरसाठी आणि त्वचेसाठी आवश्यक असतात.
लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात जे आपली त्वचा निरोगी आणि संक्रमण मुक्त ठेवण्यास मदत करतात.
दालचिनीचे सेवन केल्याने तणाव कमी होतो ज्यामुळे त्वचेवर पिंक ग्लो दिसून येतो.
नियमितपणे व्यायाम केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते.
चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आरोग्यदायी आहार घ्या.
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी नैसर्गिक प्रो़क्ट्सचा वापर करू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)