लसूण खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.
लसणामध्ये अँटीसेप्टीक, अँटी बॅक्टेरिअल, अँटी व्हायरल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुण असतात.
रिकाम्या पोटी लसूण च्या 2 पाकळ्या खाल्ल्यास अनेक आजार दूर होतात व शरीर निरोगी राहते.
लसूण खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
नियमितपणे लसूण खाल्ल्याने हृदयविकार दूर राहतात.
लसूण त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
लसणात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे त्वचेवरील पिंपल्स रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात.
रोज सकाळी लसणाच्या पाण्याचे सेवन केल्याने सर्दी खोकल्यासारखे आजार बरे होतात.
लसूणमध्ये असणारे चांगले बॅक्टेरिया पोटदुखी, गॅस यासारख्या समस्या दूर करतात.
लसूण शरीरातील उच्च रक्तदाब व साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.