मात्र, कलिंगड खरेदी करताना अनेकदा फसायला होते
बाजारातून कलिंगड घरी आणल्यानंतर ते चवीला गोड नसल्याने अनेकदा फसगत होते
ही फसगत टाळण्यासाठी आतून लाल आणि गोड चवीचे कलिंगड कसे ओळखता येईल, यासाठी चार युक्त्या आहेत
चांगल्या कलिंगडचा रंग चमकदार असतो. कलिंगडचा रंग एकसारखा नसेल किंवा त्यावर डाग असतील तर ते आतून खराब निघू शकते.
कलिंगड वरच्या बाजूने जाडसर असते. कलिंगडवर हात आपटून त्याच्या आवाजावरून ते चांगलं आहे की नाही हे आपल्याला माहित पडेल.
कलिंगडवर पिवळा डाग असेल तर ते व्यवस्थित पिकलेले असेल, आतून गोड आणि लाल असल्याचं लक्षण मानले जाते.
कलिंगडचे वजन हलके असेल तर ते आतून पोकळ अथवा पांढरे असू शकते. लाल कलिंगड वजनदार असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.