दालचिनीचे पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे होतात.
सिलोन दालचिनी आणि कॅसिया दालचिनी हे दालचिने दोन प्रकार आहेत.
दालचीनीचा वापर जेवणामध्ये किंवा चहामध्ये जास्त प्रमाणात केला जातो.
दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट,अँटी-इंफ्लॅमेटरी गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
दालचिनीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
दालचिनीच्या पाण्याचे नियमितपणे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते.
दालचिनीचे पाणी कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
दालचिनीचे पाणी मेंदूचे आजार, कर्करोग आणि इतर आजारांपासून संरक्षण करू शकते.
गरम पाण्यात दालचिनी उकळून प्यायल्याने पचनसंस्था सुधारते व पोटासंबंधी आजार दूर राहतात.
मात्र अति प्रमाणात दालचिनीचे सेवन केल्याने त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.