अंडी हा प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत मानला जातो.
अंड्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, फॉस्फोरस, सेलेनियम, कॅल्शियम, झिंक, हेल्दी फॅटसह अनेक आवश्यक तत्व असतात.
उकडलेल्या अंड्याचे सॅलड हे एक प्रथिनेयुक्त डिश आहे ज्यामध्ये उकडलेली अंडी, मोहरी, सेलेरी आणि मसाले असतात हे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील करू शकता.
चीज एग मफिन्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. तुमच्या नाष्ट्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
यामध्ये ग्रीक दही,अंडी, ऑलिव्ह आणि चीज असते यामुळे शरीराला आवश्यक पोषाकतत्वे मिळतात.
अंडी आणि पालक रॅप शरीरासाठी अत्यंत पौष्टिक ठरेल अशी डिश आहे याचा समावेश तुम्ही नाष्टा किंवा जेवणातही करू शकता.
मशरूम ऑम्लेट बनवायला अगदी सोपे आहे एक स्वादिष्ट पर्याय म्हणून तुम्ही मशरूम ऑम्लेट करू शकता.
उकडलेली अंडी कांदा आणि मसाल्याच्या मिश्रणात चवदार होईपर्यंत परतून घ्या. हा एक उच्च प्रथिनेयुक्त चवदार नाश्ता आहे.
अंडी आणि ओट्स हे दोन्ही पदार्थ प्रथिन्यानचे चांगले स्त्रोत मानले जाते यामुळे तुमच्या शरीराला प्रथिन्यानची कमतरता भासणार नाही.
ही साधी डिश अवघ्या काही मिनिटांत बनवता येते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.