आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून रोज आंघोळ केली तर शरीर चमकदार बनते आणि अनेक आजारांपासून दूर राहता येते.
तुरटी तुमच्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.
तुरटीच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे जाणून घेऊया.
तुरटीमध्ये असलेले अँटी-सेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेशी संबंधित प्रत्येक समस्येपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात.
याशिवाय तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातून येणारी दुर्गंधी कमी होते आणि बॅक्टेरिया आणि घामापासून आराम मिळतो.
तुरटी त्वचेला टोनिंग आणि घट्ट बनवण्यास मदत करते. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.
सांधेदुखीपासून आराम मिळवून देण्यासाठी देखील हे खूप उपयुक्त मानले जाते.
तुरटीच्या पाण्याने केस धुतल्यास केस मजबूत, चमकदार आणि सुंदर होतात.
शरीरावर काही जखमा असल्यास तुरटीचे पाणी जखम भरून येण्यास आणि संसर्गाचा धोका दूर करण्यास मदत करते.
तुरटीचे पाणी डोळ्यांत येऊ देऊ नका आणि ते वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा, कारण काही लोकांना त्याची ॲलर्जी असू शकते.