मांस आणि दूध या दोन्ही मध्ये चांगल्या प्रकारे पोषकद्रव्ये असतात. मांसहरासोबत दूध प्यायल्याने त्वचारोग किंवा ल्युकोडर्मा सारखे आजार होतात, असा अनेकांचा समज आहे. वास्तविक, असे होत नाही. शरीरात मेलेनिनच्या कमतरतेमुळे त्वचारोग होतो. मात्र दूध आणि मांस हे दोन्ही प्रथिनांचे स्त्रोत आहेत आणि दोन्ही एकत्र केल्याने गॅस, अस्वस्थता, पोटदुखी, मळमळ, छातीत जळजळ ह्या समस्या होऊ शकतात. जेव्हा मेलेनोसाइट्स कार्य करणे थांबवतात तेव्हा शरीरावर पांढरे डाग येतात. जे शरीरात मेलेनिन तयार करते ते आपल्या त्वचेला रंग देते. जर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर हा आजार होऊ शकतो . माशांनंतर दूध प्यायल्याने शरीरावर पांढरे डाग पडतात, असे कोणतेही वैज्ञानिक तथ्य नाही. दूध आणि मांसाहारी पदार्थांचे मिश्रण आतड्यांतील संतुलन बिघडवु शकते. हे दोन खाद्यपदार्थ दोन तासांच्या अंतराने खाण्याचा सल्ला दिला जातो.