पावसाळा आणि थंडीच्या दिवसांत ताप, सर्दी, खोकला ही सामान्य वाटणारी लक्षणं असली, तरी ती अनेकदा शरीरातल्या गंभीर आजारांची सुरुवात असते.

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

त्यामुळे या दिवसांत तब्येतीकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान होऊ शकतं.थंडीमुळे आणि तापामुळे आपल्या किडनीवर परिणाम होऊ शकतो. सौम्य किडनी आजार असलेल्या व्यक्तींमध्ये यामुळे संसर्गाचा आणि कर्करोगाचा धोका वाढतो.

Image Source: Pinterest

या काळात आपली रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते, म्हणूनच लसीकरण फार महत्त्वाचं ठरतं.सीकेडी (क्रॉनिक किडनी डिसीज) असलेल्या रुग्णांमध्ये शरीरातील टि सेल्स आणि बी सेल्स कमी होतात, त्यामुळे संसर्गाच्या आजारांना शरीर लगेच बळी पडतं.

Image Source: Pinterest

पावसाळ्यात आर्द्रतेमुळे, डासांमुळे, दूषित पाण्यामुळे खालील आजार होण्याचा धोका वाढतो.

Image Source: Pinterest

डेंग्यू, मलेरिया, न्यूमोनिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, टायफॉइड, हे सगळे आजार थेट किडनीवरही परिणाम करतात.

Image Source: Pinterest

न्यूमोनियासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी PCV13 आणि PPSV23 या लसींचा उपयोग होतो. PCV13 ही लस आधी घ्यावी आणि आठवड्यानंतर PPSV23. ५ वर्षांनी पुन्हा PPSV23 डोस घ्यावा. या लसींमुळे न्यूमोनियामुळे होणारे मृत्यू टाळता येतात.

Image Source: Pinterest

इन्फ्लूएंझा लस घेतल्यास ICUमध्ये भरती होण्याची शक्यता ८१% नी कमी होते. ही लस दरवर्षी ऑक्टोबरपूर्वी घ्यावी.डायलिसिसवर असलेल्या रुग्णांसाठी लसीकरण अधिक महत्त्वाचं ठरतं. त्यांना सामान्य माणसांपेक्षा जास्त डोस (४ डोस, ६ महिन्यांच्या आत) द्यावे लागतात.

Image Source: Pinterest

हिपॅटायटीस A, टायफॉइड, कोविड-१९ यांसारख्या लसीही पावसाळ्यात संसर्ग टाळण्यासाठी उपयोगी आहेत.

Image Source: Pinterest

शेवटी, घरगुती काळजी घ्या. ताप, थंडी, खोकला, अंग दुखणं, लघवीत बदल, थकवा यासारखी लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर उपचार केल्यास गंभीर आजार टाळता येतात.

Image Source: Pinterest

स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, लसीकरण करून स्वतःला सुरक्षित ठेवा!

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pinterest