आजकाल लहान वयातही बीपी आणि शुगर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतय.
यासाठी अनेक जण डायट, प्रोटीन पावडर तसेच रक्तातील साखरेवर नियंत्रण करण्यासाठी शुगर फ्री च्या गोळ्याही वापरतात.
पण या घरगुती बियांमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
चिया सीड्समध्ये दुधापेक्षा दहा ग्रॅम अधिक कॅल्शियम, पालकापेक्षा अधिक आयर्न, तसेच मुबलक प्रमाणात ओमेगा , फायबर आणि प्रोटीन्स आहेत.
दोन चमचे चिया सीड्स च्या सेवनाने शरीरातील अनेक आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते.
दररोज चिया सीड्सचे सेवन केल्याने वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं.
चिया सीड्समध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, जे पचन, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
चिया सीड्सच्या सेवनाने मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते, जे तुमच्या हृदयासाठी चांगले असते.
चिया सीड्स प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे, जो स्नायूंच्या आरोग्यासाठी, जखमेच्या उपचारांसाठी आणि रोग प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वपूर्ण आहे.