आजकाल लहान वयातही बीपी आणि शुगर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय. यासाठी अनेक जण नाना प्रकारचे डायट, प्रोटीन पावडर तसेच रक्तातील साखरेवर नियंत्रण करण्यासाठी शुगर फ्रीच्या गोळ्याही वापरतात. घरगुती बियांमुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारण्यास मदत होते. दुधापेक्षा अधिक कॅल्शियम आणि पालकापेक्षा अधिक आयर्न चिया सीड्समध्ये असतात. चिया सीड्स या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासह निरोगी व शरीराला मुबलक प्रथिने, फायबर, ओमेगा थ्री, फॅटी ऍसिड सह अनेक पाचक रस देतात. कोणत्या प्रकारे चिया सिड्स खाता येतील? पाण्यात भिजवून दलिया, सांजा, भाजलेल्या वस्तूंमध्ये वापरता येतो. स्मुदी बनवताना तसेच सॅलड बनवतानाही वापर करताना दिसतात. वजन कमी करण्यासाठी ही चिया सीड्स उपयुक्त आहे. ओमेगा-३ आणि वनस्पती प्रथिन्यांचे प्रमाण चिया सीड्समध्ये अधिक असतात. (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )