प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची आपल्या परीने काळजी घेत असतो. काही महीला घरच्या घरी वेगवेगळे उपाय करतात तर काही महिला या आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेत असतात. बहुतेक लोक आपला चेहरा सुंदर करण्यासाठी गोल्डन ब्लीचचा वापर करतात. गोल्डन ब्लीचचा वापर त्वचा उजळण्यासाठी आणि काळे डाग कमी करण्यासाठी केला जातो. संवेदनशील त्वचा असलेल्यांनी ते वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्यावी. गोल्डन ब्लीच तुमच्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते आणि डाग आणि मुरुम देखील काढून टाकते. गोल्डन ब्लीचमध्ये काही रसायने असतात, ज्यामुळे काही लोकांना त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात जसे जळजळ, खाज सुटणे, लालसरपणा आणि सूज इ. तुम्हीही गोल्डन ब्लीच वापरणार असाल तर ते वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या. कारण गोल्डन ब्लीच काही लोकांच्या त्वचेला शोभत नाही.