हाडे मजबूत राहण्यासाठी व्यायामासोबत काही पौष्टिक पदार्थ शरीराला मिळणे फार गरजेचे आहे.
वाढत्या वयानुसार हाडांची झीज होते.
तसेच हाडांच्या कमकुवतपणामुळे शरीराचं दुखणं वाढतं जाते.
हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियमसोबत इतर अनेक पोषक तत्ववांचीही गरज असते.
आम्ही तुम्हाला काही खास पदार्थांबद्दल सांगणार आहोत. जे पूर्णपणे शाकाहारी आहेत.
तीळ मिठाई, लाडू इत्यादींमध्ये तीळ खाल्ले जाते. तीळ हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.
तीळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते ज्याने हाडे मजबूत राहतात.
केळी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्वे मिळतात. ज्याने तुमचे हाडे निरोगी आणि मजबूत राहते.
फळांमध्ये संत्री हाडांसाठी सर्वात जास्त उपयुक्त आहेत.
हिरव्या शेंगा यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)