मुंबईत अनंत-राधिका चा विवाहसोहळा थाटामतात पार पडला. त्यांच्या लग्नाला जगभरातील प्रसिद्ध दिग्गजांनी हजेरी लावली होती. लग्नात दीपीकाने पती अभिनेता रणवीर सिंग सोबत हजेरी लावली होती. लग्नात दीपिका पदुकोण लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये रॉयल दिसत होती. तिच्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्या ड्रेस सोबतच तिने घातलेले दागिने तिला रॉयल लुक देत आहे. तौरानीने डिझाइन केलेली सुंदर लाल अनारकली परिधान करून,दीपिका लाखात एक दिसत होती. ह्या ड्रेसची किंमत सुमारे 1,45,500 रुपये आहे. दीपिकाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी सिंदूर आणि केसांचा बन केला होता. दीपिका च्या ह्या भारतीय लुक ने लोकांचे मन जिंकले.