सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा ट्रेंड आहे. अशाच चार चौघात आपण उठून दिसावं, यासाठी खास फोटोशूटही केलं जातं. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जात वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं जातं. तुम्ही जर आऊटडोअर फोटोशूट करणार असाल तर काही बाबींची काळजी घ्या. पहिली गोष्ट तर फोटोशूटसाठी चांगलं ठिकाण निवडा... चांगल्या ठिकाणाची निवड केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणाला साजेसं आऊटफिट सिलेक्ट करा. लोकेशनला अनुसरून तुमचं आऊटफिट असेल तर फोटो चांगले येतील. बाहेर जाऊन फोटोशूट करणार असल्याने दोन तीन आऊटफिट घेऊन जा. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी फोटो काढल्यास चांगल्या लाईटमध्ये फोटो निघतील.