1

मटारमध्ये असलेले 'व्हिटॅमिन-डी' हाडे मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

2

हिरव्या मटाराच्या सेवनाने शरीराला होणाऱ्या जळजळीच्या नुकसानापासून वाचवण्यास मदत होते.

3

हिवाळ्यात हिरव्या मटारचा आहारात समावेश केल्यास त्वचा मऊ आणि हायड्रेट राहते.

4

मटारचे सेवन कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते,त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.

5

हिरवेगार मटार खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते.

6

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हिवाळ्यात मटारचा आहारात समावेश केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.

7

हिरवेगार मटार खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.

8

वजन कमी करण्यासाठी हिरवेगार मटार गुणकारी आहेत.

9

आहारात मटारचा समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

10

मटारमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळतात, जे निरोगी हृदयासाठी आवश्यक आहेत.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.