दुधावरील साय ओठांना लावल्याने ओठांची चमक वाढते आणि ओठ मऊ राहतात.
पपई आणि मध यांचे मिश्रण एकत्र लावल्याने ओठांची मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते.
गुलाब पाण्याचा वापर ओठांसाठी केल्यामुळे ओठांची त्वचा कोरडी पडणार नाही आणि काळेपणाही दूर होईल.
लिंबू - साखरेचे मिश्रण ओठांवर लावल्यास ॲलर्जीमुळे किंवा उन्हामुळे काळे पडलेले ओठ चमकदार होण्यास मदत होते.
पाणी योग्य प्रमाणात घेतल्यास त्वचा हायड्रेट राहते त्यामुळे ओठांची त्वचा काळी पडणार नाही आणि ओठ मऊ राहतील.
डाळिंबाचा रस ओठांवर लावल्याणे ओठांचा काळेपणा दूर होऊन ओठ मुलायम बनतात.
संत्र्याच साल फाटलेल्या ओठांपासून तुमची सुटका करत.
हळद आणि दूध लावल्याने ओठांचा रंग अधिक उजळतो.
फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ओठांना नारळाचे तेल लावा.
ओठांवर मध लावल्याने ओठ नैसर्गिक गुलाबी राहण्यास मदत होते.