मोसंबीचा रस पोटातील आम्लता दूर करते,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.
वजन कमी करण्यासाठी मोसंबी फायदेशीर ठरते.
मोसंबीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
मोसंबीमुळे शरिरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते.
मोसंबीमध्ये 'व्हिटॅमिन-सी' भरपूर प्रमाणात असल्याने मोसंबीचा रस प्यायल्याने त्वचा चांगली होते.
डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे आणि ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते.
मोसंबीचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
मोसंबीच्या रसामुळे तुमचे केस मजबूत होतात आणि केसांची चमक राहते.
चेहऱ्यावरील मुरुमांच्या समस्येसाठी मोसंबी फायदेशीर ठरते.
मोसंबीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात ज्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो.