इलायची केळी पचनासाठी हलकी असतात, तसेच आपली भूक नियंत्रणात राहते.
इलायची केळी ही अँटीऑक्सिडंटयुक्त असून 'व्हिटॅमिन सी' चे स्त्रोत आहे.
इलायची केळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम, फायबर असते त्यामुळे शरीराला नैसर्गिक साखर मिळते.
शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी इलायची केळी फायदेशीर आहे.
इलायची केळी उच्च रक्तदाब, ह्रदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे.
हाडे मजबूत ठेवण्यासाठी इलायची केळी फायदेशीर आहे.
दातांच्या आरोग्यासाठी इलायची केळी पोषक आहेत कारण त्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळतात.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास इलायची केळी मदत करतात.
कफ आणि सर्दीसाठी इलायची केळी रामबाण उपाय आहे.
लहान बाळांचे वजन वाढण्यासाठी इलायची केळी फायदेशीर असतात.