पावसाळा आता सुरु होणार आहे. पावसाळ्यात आपल्या आरोग्यासह पायांची काळजी घेणे देखील खूप गरजेचे असते. पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्यायची हे आज सांगणार आहे. पावसाळी सॅण्डल्स फार घट्ट किंवा कडक असू नयेत, यामुळे पायाची बोटे अधिक आखडली जातात. बोटांजवळ पाणी साचवून ठेवणारे सॅण्डल्स वापरु नयेत, यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. प्रवासात किंवा ऑफिसमध्ये संधी मिळताच सॅण्डल्स थोडावेळ काढून ठेवावेत. पायांच्या बोटांमध्ये चिखल्या होण्याची शक्यता असते. तिथे अँटी फंगल पावडर लावावी. जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात 10 मिनिटे पाय बुडवून ठेवावेत. पायांना मॉइश्चराईजर लावून मसाज करावा. पावसाळ्यात पेडिक्युअर करणेही फायदेशीर ठरते त्वचा व्यवस्थित स्वच्छ केल्याने फंगस इन्फेक्शन होण्याचा धोका टळतो.