आज 18 जून रोजी फादर्स डे निमित्ताने वडीलांना त्यांच्या राशीनुसार गिफ्ट दिल्याने त्यांचं सुख, समृद्धी मिळण्यासह त्यांची भरभराट होईल. आज ‘फादर्स डे’ आहे... आज 18 जून रोजी फादर्स डे निमित्ताने वडीलांना त्यांच्या राशीनुसार गिफ्ट दिल्याने सुख, समृद्धी मिळण्यासह त्यांची भरभराट होईल. तूळ राशीच्या व्यक्तीला तुम्ही परफ्यूम, पांढऱ्या रंगाचे कपडे फादर्स डे निमित्त गिफ्ट देऊ शकता. कुंभ राशीच्या व्यक्तीला तुम्ही फादर्स डे निमित्त एखादं पुस्तक गिफ्ट देऊ शकता. वडीलांची रास मेष असल्यास त्यांना फादर्स डे निमित्ताने पेन किंवा कपडे भेटवस्तू म्हणून देऊ शकतात. यामुळे त्यांना लाभ होईल. कर्क राशीच्या लोकांना फादर्स डेला भेट देताना तुम्ही पांढऱ्या रंगाचं फुल किंवा चांदीचे दागिने देऊ शकतात. मकर राशीच्या व्यक्तीला तुम्ही फादर्स डेनिमित्त काळ्या रंगाची वस्तू भेट देऊ शकता. तुम्ही बेल्ट, शूज किंवा कपडे गिफ्ट देऊ शकता. मिथुन राशीच्या लोकांना फादर्स डे निमित्त एखादं झाड किंवा हिरव्या रंगाचे कपडे भेट म्हणून दिल्यास त्यांचं आरोग्य उत्तम राहिल. वडीलांची रास सिंह असल्यास तुम्ही त्यांना लाल रंगाची आरामदायक खूर्ची, लाल रंगाचं फुल गिफ्ट दिल्यास त्यांना लाभदायक ठरेल. वडीलांची रास वृश्चिक असल्यास त्यांना लाल रंगाची गणपतीची मूर्ती भेट दिल्यास त्यांच्या सर्व अडचणी आणि कष्ट दूर होतील. वडीलांची रास वृषभ असल्याचं त्यांना पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा चंदेरी रंगाचे फेंगशुई हत्तीची मूर्ती भेट म्हणून दिल्यास त्यांच्यासाठी उत्तम ठरेल. कन्या राशीच्या व्यक्तीला फादर्स डेच्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची डायरी भेट म्हणून देऊ शकता. धनू आणि मीन राशीच्या व्यक्तीला तुम्ही फादर्स डे निमित्त हत्तीची मूर्ती किंवा लाफिंग बुद्धा भेट म्हणून देऊ शकता. यामुळे त्यांची आर्थिक वृद्धी होईल.