उन्हाळ्यात सूर्यप्रकाशाचा परिणाम केवळ चेहऱ्यावरच नाही, तर केसांवरही होतो.
त्वचेवर सनस्क्रीन लावून तुम्ही त्याचे संरक्षण करु शकता.
पण केसांना उष्णतेपासून वाचवण्यात आपण सगळेच अपयशी ठरतो
आणि त्यामुळे केस हळूहळू तुटायला लागतात आणि कमी होतात
केसांच्या मुळांना कोमट खोबरेल किंवा ऑलिव्ह ऑईल लावा. केस गळण्याची समस्या असेल तर त्यापासून सुटका मिळेल.
बाजारात मिळणारे कोणतेही आयुर्वेदिक किंवा अॅलोवेरा जेल शाम्पू वापरावा
उन्हाळ्यात हेअर मास्क लावणं देखील आवश्यक आहे, यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.
जर केस खूप खराब झाले असतील तर त्यासाठी तुम्ही चहाच्या पाण्यानेही केस धुवू शकता
जेव्हाही घराबाहेर पडता तेव्हा सुती कापडाने केस बांधून घ्या, जेणेकरुन केसांना व्यवस्थित हवा मिळेल
(टीप: या लेखात नमूद केलेले उपाय आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी डॉक्टर किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.)