नखात धूळ किंवा घाण साचल्यामुळे ती अस्वच्छ राहतात, त्यामुळे ती नियमित कापा.



नखातील घाण काढण्यासाठी टूथपिक, टोकदार नेल-क्लीनर स्टिक या साधनांचा वापर करा.



नखे चावण्याचा मोह होत असल्यास ती बारिक ठेवणं कधीही चांगले.



साफसफाईसाठी शक्यतो हातमोजे वापरण्यास प्राधान्य द्या.



नेलपॉलिश तुमच्या नखांची शोभा वाढवेल.



नेलपॉलिश रिमूव्ह करण्यासाठी कॉटन पॅडचा वापर करा.



चुकूनही नेलपॉलिश रिमूव्हरमध्ये नखे जास्त वेळ भिजवू नका, यामुळे तुमची नखे कमकुवत होतील.



साबणाचा फेस नखांमध्ये घासण्यासाठी नेल ब्रश किंवा स्पंज वापरा.



नखे धुतल्यानंतर हात आणि नखांवर थोडे मॉइश्चरायझर लावा.



मॉइश्चरायझर तुमच्या नखांना चमकदार आणि स्वच्छ दिसण्यास मदत करेल.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.