किंमती, भरजरी साड्या आपल्या नेहमीच्या वापरातील साड्यांपेक्षा वेगळ्या ठेवाव्यात.



साड्या ठेवण्यासाठी साडी बॉक्स किंवा साडी कव्हर वापरा.



साड्या कोरड्या आणि कमी प्रकाशाच्या ठिकाणी ठेवाव्यात.



साड्या वापरल्यानंतर त्यांना ड्रायक्लीन करावे.



ड्रायक्लीन शक्य नसल्यास घरच्याघरी सौम्य डिटर्जन्ट वापरुन थंड पाण्याने साड्या धुवाव्यात.



साड्यांचे धागे नाजूक असल्याने साड्या धुताना ब्रशचा वापर करु नका.



साड्यांना इस्त्री करताना त्यावर एक पातळ सुती कपडा ठेवून इस्त्री करा, त्यामुळे साडीचे धागे व्यवस्थित राहतील.



इस्त्री करताना इस्त्री फार जास्त गरम असणार नाही याची काळजी घ्या.



साड्या कपाटामध्ये किंवा साडी बॉक्समध्ये ठेवताना त्यामध्ये डांबराच्या गोळ्यांची पुरचुंडी किंवा कडूनिंबाची पानं ठेवावीत.



साड्या वापरल्या जात नसल्यास त्या अधूनमधून काढून त्यांच्या घड्या बदलाव्यात.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.