रोज गाणी ऐकल्यामुळे तुमच्यात सकारात्मकता वाढते. गाणी ऐकल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. हृदयाचे ठोके वाढले असतील तर ते सुरळीत करण्यासाठी सुरेल संगीत ऐकणे उपयोगी ठरते. संगीतामुळे श्वसनासंबंधीचे आजारही बरे होण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर शांत संगीत ऐकणे फायदेशीर ठरते. तुमच्या आवडीच्या संगीताने तुमचे मानसिक संतुलन उत्तम राहण्यास मदत होते. तुमचा कंटाळवाणा दिवस देखील छान गाणी ऐकूण बनतो. संगीताच्या तालावर व्यायाम किंवा नृत्य केल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. गाण्यांच्या सोबतीने प्रवास सुंदर आणि सुरळीत होतो. गाण्यांमुळे शांत झोप लागते, आरोग्य सुधारते. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.