जगात ज्या प्रकारे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढतेय ते लक्षात घेता यावर उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे सेवन कमी करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवणं आवश्यक आहे. आहारात फायबरयुक्त अन्नाचा समावेश केल्यास पोट भरून निघण्यास मदत होते आणि जास्त खाणे टाळता येते. पचन दरम्यान, फायबर आपल्या पोटातून रक्तामध्ये साखर शोषण्याचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे खाल्ल्यानंतर रक्तातील ग्लुकोज सामान्य राहते. टाईप-2 मधुमेह आहार आणि जीवनशैलीद्वारे सहजपणे नियंत्रित केला जाऊ शकतो. मधुमेहाने त्रस्त असलेल्या व्यक्तीने दैनंदिन आहारातील फायबरचे प्रमाण केवळ 25 ते 40 ग्रॅमने वाढवावे. लठ्ठपणामुळे टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो , त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात फायबरचे प्रमाण वाढवा. मधुमेही रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही खूप जास्त असतो. फायबरयुक्त आहार घेतल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.