लिंबू 'व्हिटॅमिन सी' समृध्द नैसर्गिक घटक आहे.
लिंबू अँटीफंगल गुणधर्मयुक्त आहे.
केसांच्या आरोग्यासाठी लिंबू गुणकारी आहे, त्यामुळे केस सुंदर आणि चमकदार होतात.
केसांना हायलाईट करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसाचा उपयोग करा.
लिंबाचा रस केसांना हायलाईट करण्यासोबतच केस मजबूत आणि चमकदार ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
एका भांड्यात कोमट पाणी घ्या.
त्यामध्ये दालचिनी पावडर, लिंबाचा रस, संत्र्याचा रस आणि 3-4 थेंब कंडिशनर घालून एकत्र करा.
मग तुम्हाला ज्या ठिकाणी केस हायलाईट करायचे आहेत त्याठिकाणी ब्रशच्या साहाय्याने लिंबाची पेस्ट लावा.
त्यानंतर रंग बदलण्यासाठी थोडा वेळ ऊन्हामध्ये बसा, त्यामुळे रंग बदलण्यास मदत होते.
शेवटी कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा आणि मऊ कपड्याने हळुवार पुसा.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.