गुलाब पाणी हे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांसाठी उपयुक्त ठरु शकते. हे चेहऱ्यावर लावल्याने अनेक समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी गुलाबपाणी फायदेशीर ठरु शकते. यामुळे चेहऱ्याची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच पिंपल्सपासून देखील सुटका मिळण्यास मदत होऊ शकते. त्वचा उजळ बनवण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. चेहऱ्यावरील काळपटपणा दूर होण्यास देखील मदत होऊ शकते. तसेच यामुळे त्वेचेचा पीएच लेवल देखील नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते. चेहरा मऊ होण्यास देखील यामुळे मदत होऊ शकते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरु शकते.